रानमळा येथे खंडेराव महाराज यात्रा
रानमळा यात्रेत नवस फेडणाऱ्या भाविकांची गर्दी
धुळे तालुक्यातील रानमळा येथील खंडेराव महाराज यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त मंदिराला रंगरंगोटी व रोषणाई तसेच परिसराची स्वच्छता ही करण्यात आली. यात्रा उत्सव निमित्त गावात दोन दिवस लोकनाट्य तमाशा मंडळाचा शानदार कार्यक्रम देखील ठेवण्यात आला आहे. तसेच तळी भरणे तगतरावची गावातून मिरवणूक देखील काढण्यात आली. ग्रामदैवत खंडेराव महाराज याचे चांगले सत्व असल्याने नवस फेडणाऱ्यांनी ही गर्दी केली होती. यात्रेत लहान मोठे पाळणे संसार उपयोगी भांडे तसेच विविध प्रकारचे दुकाने थाटली आहेत. तसेच यावर्षी पहिल्या दिवसाचा पूजेचा मान जाहगीरदार परिवार कदमबांडे यांच्या कुटुंबाचा होता तर दुसऱ्या दिवसाचा मान गावकऱ्यांसमोर लिलाव पद्धतीने रानमळा विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन संभाजीराव गावडे तसेच मा. सरपंच प्रवीण पवार यांना मिळाला. तसेच गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून खंडेराव महाराजांच्या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात येत आहे. जिल्ह्यात नवे असे भव्य खंडेरावाच्या मंदिराचे काम युद्धपातळीवर चालू आहे.
यावेळेस पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, माजी सरपंच प्रवीण पवार, अध्यक्ष रामराव कदमबांडे, उपाध्यक्ष संतोष धुमाळ, सेक्रेटरी रमेश गावंडे, खजिनदार बटू उचाळे, तुकाराम गावडे, दिनेश आटोळे, गोलू सोनवणे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादक - रवींद्र नगराळे ( सांज सम्राट )
